Dhananjay Munde Case : तक्रारदार महिलेच्या वकिलांनी दिला सूचक इशारा, म्हणाले – ‘व्हिडीओ उघड केले तर तोंडं गप्प होतील’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे( Dhananjay Mundhe) यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहेत. तर गुरुवारी (दि. 14) दुपारी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी आपल्याकडे असे व्हिडिओ क्लिप्स आणि खूप काही गोष्टी आहेत, ते उघड झाल्यानंतर लोकांची तोंडं बंद होतील, असा इशारा मुंडें यांना दिला आहे.

आज तक्रारदार महिला रेणू शर्मा (Renu Sharma) ही डी. एन. नगर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला असून त्यादरम्यान त्यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पोलिसांबाबत नाराजी व्यक्त करत म्हणाले की, 4 दिवसांपासून आम्ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, ओशिवरा पोलीस ठाण्यात पुढे काही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे आम्ही नाराज आहोत. उच्चस्तरीय लोकांकडे तक्रार केल्यानंतर मुंडेंनी याबाबत खुलासा केला.

रेणूविरोधात ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत करोडो रुपयांची खंडणी उकळण्याबाबत खोटे आरोप केले आहेत. माझ्या पक्षकाराची काहीच संपत्ती नाही. ती स्वतः पीजीमध्ये राहते, त्याचे भाडे 10 हजार ते 15 हजार आहे. त्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही, उदरनिर्वाहासाठी त्यांनी दागिने देखील विकले. तसेच आरोपांचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांनी केला आहे.