म्हणून काँग्रेसने मतदान केंद्रापासूनच काढली जिवंत माणसाची प्रेतयात्रा

मलकापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मतदान करायला गेला मात्र मतदार यादीत मृत दाखविण्यात आले. निवडणूक आयोगा कडूनही समाधानकारक सहकार्य न मिळाल्याने काँग्रेसकडून त्या जिवंत मतदाराची प्रेतयात्रा काढण्यात आली. निवडणूक आयोग मुर्दाबाद, शासन -प्रशासनाचा धिक्कार असो. अशा विविध घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान, मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयावरील बूथ क्र. १६६ वर मोहनसिंग चिंधू गणबास, श्रीकृष्ण संपत शेकोकार हे सकाळी ८ वाजेच्या सुमारास गेले होते. मात्र मतदार यादीत त्यांच्या नावासमोर मृत दर्शवले होते. त्यावेळी मतदान करता येणार नाही हे समजले. मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. त्यांना मतदान करता यावे म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले मात्र मतदार यादीत मृत दाखवल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

त्यावेळी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ त्या व्यक्तीची प्रेतयात्रा काढली. स्वामी विवेकानंद आश्रमाजवळून ही अंत्ययात्रा बसस्थानका जवळून बुलढाणा रोड मार्गे थेट तहसील कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी निवडणूक आयोग मुर्दाबाद. शासन -प्रशासनाचा धिक्कार असो अशा विविध घोषणाही त्या वेळेस देण्यात आल्या.

Loading...
You might also like