जखमी बिबट्याचे फोटो काढणे आले अंगाशी (व्हिडिओ)

अलिपूरदौर (पश्चिम बंगाल) : वृत्तसंस्था – मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून प्रत्येकजण एखादी घटना घडली की ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळा जीव धोक्यात घालून फोटो काढण्याचा प्रयत्न केला जातो आणि यामध्ये अपघात होतो. असाच एक प्रकार पश्चिम बंगाल येथील अलिपूरदौर जिल्ह्यात घडला आहे. एका जखमी बिबट्याचे फोटो काढण्याचे धाडस एका व्यक्तीच्याच अंगाशी आले.

जखमी बिबट्याचा फोटो काढण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तीवर चवताळलेल्या बिबट्याने झडप घातली. चवताळलेल्या बिबट्याने अचानक झपड घातल्याने बिबट्याला पाहायला आलेल्यांची पळता भुई थोडी झाली. लोक सैरावैरा पळत असताना बिबट्याने एका व्यक्तीला पकडून त्याचे लचके तोडले. घाबरलेल्या व्यक्तीने बिबट्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला.

एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जखमी झालेला एक बिबट्या रस्त्याच्या कडेला पडलेला दिसत आहे. त्याचा फोटो काढण्यासाठी एक व्यक्ती त्याच्या जवळ जाऊन फोटो काढताना व्हिडिओत दिसत आहे. अचानक बिबट्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर झेप घेतो आणि त्याला खेचत नेतो. परंतु जखमी असल्याने तो त्या व्यक्तीला अधिक दूर नेऊ शकत नाही. सुदैवाने तो व्यक्ती यातून बचावतो. मात्र, बिबट्याच्या नख्या आणि दात लागल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like