#Video : भारत-पाक मॅचनंतर ‘पाकिस्तानी’ आजीबाईंचा ‘तो’ व्हिडीओ ‘व्हायरल’, आजीबाईंच्या ‘डोक्यात’ पाकिस्तानही भारतातच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्डकपच्या कालच्या (रविवार, दि 16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यावरून पाकिस्तानला समजले आहे की, भारताला हरवणे हे त्यांच्यासाठी किती अवघड आहे ते. सामन्यानंतर तयार करण्यात आलेला एक व्हिडीओ सध्या सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत एक आजी दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ आहे. हा सध्या झपाट्याने सोशलवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आजी इंडिया भारी असल्याचं म्हटलं आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, एक महिला आजीबाईंना विचारते की, पाकिस्तान चांगला आहे की इंडिया ? यावर विचार करून आजी म्हणते की, ‘इंडिया’ यानंतर प्रश्न विचारणारी महिला नाराज होत म्हणते की, “नाही आजी, तुम्ही तर पाकिस्तानमध्ये राहताना ना. पाकिस्तान आपला देश आहे. त्यानंतर आजीबाईंनी जे उत्तर दिलं त्यावरून स्पष्ट होतं की, आजीबाईंच्या डोक्यात आजही तोच भारत आहे, जो आजचा पाकिस्तानही त्याच्यात सामावलेला आहे. आजीबाई म्हणते की, “आज तर राहते आहे पाकिस्तानात परंतु आधी तर भारतच होता ना.”

आजीबाईंचा हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत.

सिने जगत –

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा