Video : जॅकलीन फर्नांडिस आणि ‘या’ अभिनेत्रीमध्ये विमानात चढण्यावरून जुंपली ! प्रचंड व्हायरल झाला धक्काबुकीचा व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेत्री लिसा हेडन यांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड चर्चेत आहे. जॅकलीन आणि लिसा यांच्यात विमानात चढण्यावरून जुंपली आहे. सध्या त्यांच्या या मजेदार भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

जॅकलीन आणि लिसा यांचा एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, विमानात आधी चढण्यावरून दोघींमध्ये जुंपली आहे. दोघी एकमेकींना मागे खेचत आहे. खधी लिसा जॅकला मागे ओढत आहे तर कधी जॅक लिसाला मागे खेचत आहे.

लिसा आणि जॅकलीन यांचा हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की, आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. काही चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. काही चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

जॅकलीनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती जॉन अब्राहमच्या अटॅक या सिनेमात दिसणार आहे. याआधी ती मिसेज सिलियर किलर या वेब सीरीजमध्ये दिसली आहे. 2009 साली आलेल्या अलादीन या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं

लिसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं इंडियाज टॉप मॉडेल शो साठी जजिंग केलं आहे. लिसानं आयशा, क्वीन, हाऊसफुल 3 अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. भारतात मॉडेलिंग करण्याआधी लिसा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत रहात होती.