Video : ‘सस्पेंस-थ्रिलर’नं भरपूर जॅकलीनचा ‘मिसेस सिरियल किलर’ सिनेमा रिलीज !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जॅकलीन फर्नांडिस आणि मनोज वाजपेयी यांच्या नेटफ्लिक्सवरील मिसेस सिरीयल किलरचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे .यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, मनोज वाजपेयी, मोहित रैना, झेन मेरी खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

मिसेस सिरियल किलरची स्टोरी हॉलिवूडचा सिनेमा साईनपोस्ट टू मर्डरवरून घेतली आहे जो 1995 साली रिलीज झाला होता. मिसेस सिरियल किलर हा सिनेमा शिरीष कुंदरनं डायरेक्ट केला असून फिल्म मेकर आणि त्यांची पत्नी फराह खाननं प्रोड्युस केला आहे. 17 एप्रिल रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा एक सायकॉलॉजिकल मर्डर मिस्ट्री ड्रामा आहे ज्यात जॅकी तिच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. मनोज वाजपेयीनं तिच्या नवऱ्याची भूमिका साकराली आहे. ही प्रामुख्यानं एका डॉक्टरची कहाणी आहे ज्यात त्याला खुनांच्या मालिकेसाठी दोषी ठरवलं जातं. पत्नी आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी सिरियल किलरप्रमाणेच गुन्हा करते.

जॅकलीननं अशा प्रकारे डार्क कॅरेक्टर साकारण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. सिनेमाची पूर्ण स्टोरी नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पहावा लागेल. जॅकलीन, मनोज वाजपेयी, सर्वांनीच आपापली भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे.