अंमली पदार्थ प्रकरणी करण जोहरचा ‘तो’ व्हिडीओ NCB हाती लागला, ‘या’ दिग्गज कलाकारांचा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार रिया चक्रवर्ती हिनं अमंली पदार्थ प्रकरणात 5 प्रमुख व्यक्तींची नावं घेतली आहेत. यात अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री कुलप्रीत सिंह, डिझायनर सिमोन खांबाटा, सुशांतचा व्यवस्थापक, दिल चाहता है सिनेमाचा निर्माता मुकेश छाबडा यांच्या नावांचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील 80 टक्के लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात. करण जोहरनं शेअर केलेल्या व्हिडीओत विकी कौशलजवळ पांढऱ्या रंगाचा अंमली पदार्थासारखा घटक दिसत आहे. यावरून आता विकी कौशलनं ड्राग्सचं सेवन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. एसीबीनं या व्हिडीओची कसून चौकशी केली आहे. सत्य काय आहे हे काही दिवसात स्पष्ट होईलच. या अंमली पदार्थ प्रकरणात बॉलिवूडमधील एकूण 25 जणांची नावं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

काय आहे व्हिडीओत ?

निर्माता दिग्दर्शक करण जोहर यानं काही दिवसांपूर्वी राहत्या घरीच एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचा व्हिडीओ करणनं सोशल मीडियावर शेअर केला होता. यात रणबीर कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, झोया अख्तर, आर्यन मुखर्जी, मीरा राजपूत, शकून बत्रा असे अनेक कलाकार होते. करण जोहरनं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.

व्हिडीओत सर्वजण नशेत आणि मद्यधुंद अवस्थेत दिसत होते. विकी कौशलजवळ पांढऱ्या रंगाचा अंमली पदार्थासारखा घटक दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावरून टीका केली होती. काही लोकप्रतिनिधींनी यावर कारवाई करण्याचं सांगितलं होतं. परंतु यात करण जोहर असल्यानं कारवाई झाली नाही असंही बोललं गेलं. आता हा व्हिडीओ नार्कोटींग कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती लागला आहे.