Video : मानसी नाईकच्या आईनं घेतला जबरदस्त उखाणा ! व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या काही विधीनांही सुरुवात झाली आहे. मानसीनं याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

मानसीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिची आई एक जबरदस्त उखाणा घेताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. मानसी लिहिते की, आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाई, तरीही आईचा महिमा लिहिता येणार नाही. आईचा उखाणा. लव्ह यु आई.

उखाणा घेताना मानसीची आई म्हणते, माझी लोक पडद्यावर चमचमणारी चांदणी, लग्नघटीका समीप आली, गाऊ आनंदाची गाणी, गृहमुखाचे दिवशी सांगते राजन माजे राजा आणि मी त्यांचीच राणी.

मानसी तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत लग्न करणार आहे. येत्या 19 जानेवारी रोजी ती महाराष्ट्रीयन पद्धतीनं पद्धतीनं विवाहबद्ध होणार आहे. हे लग्न मंबईत पार पडणार आहे. लग्नानंतर मानसी प्रदीप सोबत त्याच्या मूळ गावी फरिदाबादला रवाना होणार आहे. तिकडेच प्रदीपकडील काही विधी पार पडणार आहेत. सोशल सतत ॲक्टीव्ह असणारी मानसी चाहत्यांना सतत अपडेट्स देताना दिसत असते.

मानसीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांचा मानसीचा लुकही खूप आवडला आहे.