PM मोदी छत्रपती शिवाजी अन् शहा तानाजींच्या रूपात, ट्विटरवरील ‘त्या’ व्हिडीओमुळं ‘तळपायाची आग मस्तकी’ (व्हिडीओ)

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधासभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केल्याचे पहायला मिळत आहे. चित्रपटांच्या व्हिडीओ क्लिपचाही प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर वापर या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहे. पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने आता राजकारणात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी थेट तानाजी चित्रपटाचे ट्रेलर वापरून त्या ऐवजी सध्याच्या राजकारणातील चेहरे लावण्यात आले आहेत. चित्रपटातील तानाजी अर्थात अजय देवगण ऐवजी गृहमंत्री अमित शहा तर शिवाजी महाराजांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. चित्रपटामध्ये असलेल्या व्हिलनला अर्थात सैफ अली खानला दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. त्यामुळे आता या व्हिडीओ वरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे,.

याबाबत बोलताना संजय राऊत यांनी मी ही व्हिडीओ क्लिप संभाजी ब्रिगेड तसेच सांगली बंद पुकारणारे या सर्व पाठवली आहे आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे. तसेच शिवसेने विरोधात आवाज उठवणाऱ्या सर्व संघटना आता कोठे गेल्या आहेत असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/PoliticalKida/status/1218827562035466240

केव्हा असेल मतदान ?
दिल्ली विधानसभेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी आहे. 22 जानेवारी रोजी नावाची छाननी आणि अर्जाची तपासणी केली जाईल. 24 जानेवारी हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. 8 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडेल तर 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –