‘चिमुरडी’चा ‘असा’ व्हिडीओ पाहून ‘बिग बी’ अमिताभ प्रभावित, ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर एका लहानग्या मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या चिमुरडीचे हावभाव पाहून प्रत्येकजण तिला इम्प्रेस होताना दिसत आहे. एवढेच काय तर बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन हेदेखील त्या मुलीला पाहून प्रभावित झाले आहेत. बिग बींनी या चिमुरडीच्या व्हिडीओला रिट्वीट केलं आहे. सध्या या व्हिडीओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

व्हिडीओत दिसत आहे की, ही चिमुरडी मुलगी एका पंजाबी गाण्यावर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. अनेकजण या चिमुरडीच्या क्युट अंदाजाचं कौतुक करताना दिसत आहे. बिग बी यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “वाह क्या बात है.”

हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला आहे की, एका दिवसातच 2 लाख 19 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने त्याचे व्ह्युज वाढत आहेत. बिग बी यांनी असे व्हिडीओ शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा