एकेकाळचा पाकिस्तान क्रिकेट टीमचा ‘कॅप्टन’, आता उदरनिर्वाहासाठी बनलाय चक्क ‘ड्रायव्हर’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या क्रिकेट संघटनेच्या ढिसाळ कारभाराचा फटका खेळाडूंना बसत आहे. एकेकाळी प्रथम श्रेणीत खेळणाऱ्या फझल सुभान (वय -31 ) या क्रिकेटपटूला उदरनिर्वाहासाठी ड्रायव्हिंग करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने फझलचा कराचीत मिनी ट्रक चालवताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा व्हिडिओ पाहून पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी फझलबद्दल सहानभुती व्यक्त केली.

फझल सुभान हा पाकिस्तानातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील टीमचा तो कॅप्टनही राहिला आहे. फझलने 40 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 32.87च्या सरासरीनं 2301 धावा केल्या आहेत. त्यात पाच शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे.

विभागीय क्रिकेट खेळताना फझलला एक लाख पगार मिळायचा, परंतु तोच आता अत्यंत कमी दिला आहे. त्यात कुटुंबाची गुजराण करणे अशक्य आहे. त्यामुळे त्याला बॅट ऐवजी हातात स्टिअरिंग घ्यावं लागलं आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना फझल म्हणला की,  किमाल माझ्या हाताला काम आहे, याचे समाधान आहे. आता जी परिस्थिती आहे, ती पाहता भविष्यात हेही काम राहिल याची खात्री नाही. आमच्याकडे पर्याय नाही. मुलाबाळांसाठी काही तरी करावं लागेल. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ही रक्कम पुरेशी नाही.

 

Visit : Policenama.com