‘खाकी वर्दी’च्या माणुसकीने ‘वृद्ध’ महिलेच्या ‘चेहऱ्यावर’ खुलवले ‘हसू’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खाकी वर्दीतील पोलीस म्हणलं की कायमच दिसतो तो एक तडफदारपणा. परंतू याच खाकी वर्दीतून मध्यप्रदेशच्या मगरोन पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी असलेल्या श्रद्धा शुक्ला यांनी जो माणूसकीचा आदर्श उभा केला त्यामुळे त्यांचे कौतूक होत आहे. मनरोग बस स्थानक परिसरात एक निराधार वृद्ध महिला फिरत होती.

या महिला अधिकाऱ्यांने हे पाहून त्या महिलेची विचारपूस केली आहे त्या वृद्ध महिलेला स्वच्छ कपडे आणि चप्पल घालायला दिली, चौकशी नंतर लक्षात आले की ही महिला लुली बायपास जवळील हरदुआ गावची आहे. त्यानंतर या वृद्ध महिलेच्या मुलाला मिठ्ठू सिंह यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले आणि चौकशी करुन त्या महिलेला आपल्या गाडीतून हरदुआ या गावी रवाना केले.

यामुळे या महिला अधिकाऱ्याचे कौतूक करण्यात येत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी देखील पोलीस अधिकारी श्रद्धा शुक्ला यांचे कौतूक केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. श्रद्धा शुक्ला यांच्या या कार्याबद्दल सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील ट्विट करत श्रद्धा शुक्ला यांचे कौतुक केले.

Visit : policenama.com