Mumbai : RPF कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधनाने गरोदर महिलेसह चिमुकल्याचा जीव वाचला, घटना CCTV मध्ये कैद (Video)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  एका लहान मुलासह रेल्वेत चढण्याचा प्रयत्नात गरोदर महिला तोल जाऊन खाली पडली. मात्र ड्युटीवरील तैनात असलेल्या आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत गरोदर महिलेसह लहान मुलाचा जीव वाचविला. सोमवारी (दि. 3) दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही थरारक घटना घडली. याबाबत मध्य रेल्वेने ट्विटर हॅण्डलवर ट्वीट केले असून या घटनेचे सीसीटीव्ही देखील ट्वीट केले आहे. त्यामुळे यादववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शोभा कुमारी असे या महिलेचे नाव आहे. रेल्वेने या थरारक घटनेचे ट्वीट करून प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु नका, असा सल्ला दिला आहे. दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म 5 वर सोमवारी (दि. 3) सीएसएमटी- दानापुर स्पेशल गाडीत चढताना गर्भवती महिला आपल्या मुलासह पडली होती. शोभा कुमारी ही दादरवरून दानापूरला जात होती. मात्र तिला उशीर झाल्याने तिने धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तिचा तोल गेल्याने ती आणि मुलगा खाली पडला. मात्र यादव यांनी प्रसंगावधान दाखवत दोघांनाही रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले. याबाबत यादवचे कौतुक होत असून त्यांना लवकरच सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान प्रवाशांनी चालू गाडीत चढू अथवा उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.