Video : शिवसेना खासदार भर बैठकीत मास्क काढून शिंकले, नितेश राणेंची जोरदार टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांनी आता शिवसेना खासदार विनायकर राऊत (Vinayak Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. भर बैठकीत राऊत तोंडाचा मास्क काढून शिंकले. याचा व्हिडीओ सोशलवर पोस्ट करत नितेश राणे यांनी टीका केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये नितेश राणे म्हणतात, “हे रत्नागिरी सिधुदुर्गचे खासदार ! एकदा त्यांना विचारा त्यांनी मास्क का घातला आहे. अशा मुर्खांपासून माझ्या कोकणाला आता देवानंच वाचवावं.” असा सणसणती टोला त्यांनी लगावला आहे.

नेमकं काय घडलं ?

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी एका बैठकीत त्यांच्यासोबत शिवसेना खासदार विनायक राऊत देखील होते. यावेळी दोघांनीही मास्क परिधान केला होता. सत्तार बोलत असताना बाजूला बसलेल्या विनायक राऊतांना शिंक आली. नाक किंवा तोंडावाटे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लोक मास्क परिधान करतात. मात्र राऊत यंनी शिंक येताच नेहमीच्या सवयीप्रमाणे हात समोर धरला. यावेळी त्यांनी एक चूक केली. शिंक येताच त्यानी मास्क काढला आणि नाका-तोंडासमोर हात धरला आणि पुन्हा मास्क घातला. नेमका हाच व्हिडीओ नितेश राणे यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.