बिहारचा नेता कोण ? काँग्रेसच्या आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी चोर म्हटल्याचं झालं निमित्त (व्हिडिओ)

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून बनण्यावरून चढाओढ सुरू झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात. नितीश कुमार यांना देखील एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या चर्चा अजूनही संपलेली नाही. तोच अवघ्या १९ जागा जिंकलेल्या काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार ? यावरून तुंबळ हाणामारी सुरु आहे. धक्कादायक म्हणजे आमदारांमध्ये हा राडा सुरु आहे. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. तर येथील मित्रपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोर लावला आहे. दरम्यान, अशातच स्नेही आज नियुक्त नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावली होती.

या काँग्रेस आमदारांनी बैठकीतच शुक्रवारी मोठा गोंधळ घातला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटात मोठा राडा झाला आणि शिवीगाळही करण्यात आली. महाराजगंज आमदार विजय शंकर दुबे आणि विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसचा गटनेता कोण? यावरून सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेना चोर म्हणलं. यामुळे संतापलेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात केली. या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. या वेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

मतमोजणी पुन्हा करा; तेजस्वी यादव यांची मागणी
निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले. बिहार निवडणूक जिंकल्यानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. बिहारची जनता आमच्यासोबतच असल्याचं त्यांनी यावेळी म्हणलं. आम्ही हरलो नाही आम्हाला हरवलं गेलं आहे असे देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावी, अशीदेखील मागणी केली आहे.

उमेदवाराचा संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे तेव्हा पुन्हा मतमोजणी अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणे आवश्यक आहे.
तसंच तेजस्वी यादव पुढे म्हणाले, की हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाली. तेव्हा मते आमच्या बाजूने होती; मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला. जनादेश महाआघाडी सोबत होता; मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीएच्या पक्षात होता.