‘आदित्य ठाकरे माझा छोटा भाऊ’ : संजय दत्त (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना अनेक बॉलिवूड स्टार्स पाठिंबा देत आहेत. संजय दत्त, दीनो मोरिया आणि सुनील शेट्टी यांनी व्हिडीओ शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, आदित्य सारख्या युवा नेत्याची देशाला आज गरज आहे. यावेळी संजू बाबाने बाळासाहेब ठाकरेंचीही आठवण काढली.

‘आदित्य ठाकरे माझा छोटा भाऊ’
संजय दत्त म्हणाला, “आदित्य ठाकरे माझा छोटा भाऊ आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ठाकरे घराण्याचा तो वंशज आहे. त्यांना माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे. ते माझ्या पित्यासमान आहेत. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. उद्धव ठाकरेदेखील त्यांच्या प्रमाणेच आहेत. मी आदित्यला शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे तो मोठा विजय मिळवेल.”

सुनील शेट्टी आणि दीनो मोरियानेही दाखवला विश्वास
सुनील शेट्टी आणि दीनो मोरियानेही आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांच्या विजयासाठी इच्छा व्यक्त केली. ‘आदित्य यंग आहेत आणि त्यांना महाराष्ट्राची समज आहे. ते निवडणुकीतही विजय मिळवतील आणि चांगले नेता सिद्ध होतील.’ असा विश्वास सुनील आणि दीनो यांनी व्यक्त केला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी