home page top 1

अतिक्रमण कारवाईच्या वेळी महिला पोलिसांकडून वृध्द महिेलेला बेदम मारहाण (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – टपरी चालक महिलांनी अतिक्रमणविरोधी पथकाला विरोध केल्याने चिडलेल्या महिला पोलिसांनी ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या सुनेला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबद प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लता हाके आणि गंगूबाई हाके या दोघांना सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजेश खुडे यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यातील हडपसर येथील मगरपट्टा रोडवर अतिक्रमण विभागाकडून दोन दिवासांपासून अतिक्रमण कारवाई सुरु आहे. या कारवाईला विरोध करत असतानाच महिला पोलिसांकडून वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप म्हणाले, शहरामध्ये अतिक्रमण कारवाई सुरू असून अतिक्रमण कारवाई दरम्यान नागरिकांकडून विरोध होत आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण होतात. यामुळे अतिक्रमण कारवाई करताना पोलिसांची मदत घेतली जाते. अशाच प्रकारे मगरपट्टा येते अतिक्रमण कारवाई करत असताना हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मंगळवारचा असून मगरपट्टा येथे कुमार पॅराडाईजजवळ लक्ष्मी लॉन्स रस्त्यावरील पादचारी मार्गावर चहाची टपरी या दोन महिलांनी सुरु केली होती. ही टपरी बेकायदा असल्याने त्यावर मंगळवारी सायंकाळी महापालिकेकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. त्यावेळी दोघींनी कारवाई करण्यास विरोध केला. कारवाई केली तर पेटवून घेण्याची धमकी दिली. त्यावेळी महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली.

महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसलण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्याला विरोध केला. तसेच त्या दोघी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेल्या आणि पोलिसांवर दगड फेकले. त्यामुळे पोलिसांनी आपल्या बचावासाठी हा पवित्रा घेतला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

Loading...
You might also like