जिममध्ये क्रिकेटर करत होते ‘डान्स’, हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मानं घेतली ‘मज्जा’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्त संस्था – शिखर धवन सध्या दुखापतग्रस्त असल्याने भारतीय क्रिकेट टीमच्या बाहेर आहे, तर पांड्याची सुद्धा अशीच स्थिती आहे. भारतीय क्रिकेट टीमचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माला सुद्धा रणजी मॅचदरम्यान दुखापत झाली होती, ज्यानंतर हे खेळाडू क्रिकेटपासून दूर आहेत. परंतु, लवकरच परतण्याची ते तयारी करत आहेत. भारतीय आघाडीचा फलंदाज शिखर धवन सोशल साईट इंस्टाग्रामवर खुप अ‍ॅक्टिव्ह असतो आणि फोटो व्हिडिओ शेयर करत असतो. शिखर धवनने आज एक जिमदरम्यानचा व्हिडिओ शेयर केला, ज्यामध्ये त्याच्यासोबत हार्दिक पांड्या आणि इशांत शर्मा खुप मस्ती करताना दिसत आहेत.

शिखर धवनने जो व्हिडिओ शेयर केला आहे, त्यामध्ये हार्दिक पांड्या एक्सरसाइज करत पुढे येतो, तेव्हा इशांत शर्मा जिम रॉड घेऊन डान्स करताना दिसत आहे. शिखर धवन जो सायकलिंग करत आहे तो धावत येऊन हा ग्रुप जॉईन करतो, आणि डान्स करू लागतो. बॉलिवुड चित्रपटातील यहाँ के हम सिकंदर या गाण्यावर सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. धवनने या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, कोण म्हणतं की पूर्ववत होणे बोरिंग आहे.

यावर अहमदने कमेंट केले की, आणखी एक एकजण तुम्हाला लवकरच जॉईन करणार आहे. हार्दिक पांड्या मागील अनेक महिन्यांपासून टीमपासून दूर आहे. तर शिखर धवन दुखापतग्रस्त होऊन भारतीय क्रिकेट टीमच्या न्यूझीलंड दौर्‍यातून बाहेर झाला होता. भारतीय क्रिकेट टीम यावेळी न्यूझीलंड दौर्‍यावर आहे.

You might also like