दुर्देवी ! पती खुलेआम कापत होता पत्नीचा गळा,गर्दीतील लोक खूनाचा व्हिडीओ बनवण्यात मग्न

वाराणसी : पोलीसनामा ऑनलाइन  –   युपीच्या लखीमपुर खीरी जिल्ह्यात पलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला एक तरूणाने आपल्या पत्नीची गळा चिरून निर्घृण त्या केली. पती रस्त्याच्या कडेला आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या करत असताना घटनास्थळी उपस्थितीत लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत होते.

पीलीभीत जिल्ह्यात राहणारा रंजीत कुमार आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी लखीमपुर खीरी जिल्ह्याच्या निघासन येथील सलीमाबाद गावात आला होता, पण त्याची पत्नी त्याच्या सोबत जाण्यास नकार देत होती.

जेव्हा जबरदस्तीने तो पत्नी मंजूला घेऊन पीलीभीतला जाण्यासाठी सासुरवाडीतून निघाला, तेव्हा रस्त्यात पलिया येथे पोहचला असता पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. रंजीतने पत्नीला प्रथम गोळी मारली आणि नंतर रस्त्याच्या कडेला चाकूने भोसकून तिची हत्या केली.

रंजीत आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या करत असताना घटनास्थळी उपस्थित लोक या घटनेचा व्हिडिओ बनवत होते. त्यानंतर लोकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला पण त्या महिलेचा जीव वाचवण्यासाठी कुणीही पुढे गेले नाही.

या थरारक घटनोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहताना व्हिडिओ बनवणार्‍या लोकांचे क्रौर्यसुद्धा दिसून येत आहे. कारण तो तरूण पत्नीचा गळा चिरत असताना हे लोक शांतपणे व्हिडिओ बनवत होते.

असे म्हटले जात आहे की, आरोपी तरूण हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता. त्याला संशय होता की गावातील एका तरूणाशी पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, ज्यामुळे त्याने पत्नीची गोळी मारून हत्या केली आणि नंतर गळा चिरून तिला ठार मारले.

लखीमपुर खीरी जिल्ह्याच्या एसपी पूनम यांनी या खूनाच्या घटनेचा व्हिडिओ बनवणार्‍या लोकांच्या चौकशीचे सुद्धा आदेश दिले आहेत. तसेच महिलेचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा मुख्यालयात पाठवला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.