#Surgicalstrike2 : पुलवामा शहिदांच्या आत्म्याला शांती नाही मिळाली : CRPF जवान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. त्याचे चोख प्रत्युत्तर भारताने हवाईहल्ला करून दिला. याबाबत छत्तीसगड येथील एका सीआरपीएफ जवानाने प्रतिक्रिया दिली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही असे त्याने म्हंटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांचा  व्हिडीओ देखील जारी केला आहे.

यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सीआरपीफ जवान जे. डी. रत्नाकर म्हणाले ,” पाकिस्तानाला आपण जशाच तसे उत्तर दिले, उद्याही जर असा कृत्य केलं तर घरात घुसून मारू, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या आत्म्याला अजून शांती मिळाली नाही, जोपर्यंत मास्टरमाईंड मारला जात नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही’ अशी भावनाही या रत्नाकर यांनी व्यक्त केली. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे. या हल्ल्यात ३५० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा ३ हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला आहे. बालाकोट, चकोटी, मुज्जफराबाद या तीन ठिकाणी एकाच वेळी हल्ला करण्यात आला आहे. भारताच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांनी या तीन ठिकाणी १ हजार किलो बॉम्बफेक करुन ही कारवाई केली आहे. पहाटे साडेतीन वाजता केलेल्या या हल्ल्यात भारताची सर्व विमाने आपले ठरलेले लक्ष्य साधून काही मिनिटातच परत सुरक्षितपणे भारताच्या हद्दीत परत आली आहेत. या हल्ल्यात ३५० अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे.