सेल्फीने संपवली दहशतवाद्यांची टोळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवादाला चोख उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दहशतवाद्यांची टोळी बाॅम्बच्या स्फोटात उडाल्याचं दिसत आहे. सेल्फी घेत असताना हा स्फोट झाल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. सोशलवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमागचे सत्य अनेकांना माहीत नाही.

नेमक काय आहे व्हिडीआओमध्ये ?

काही दहशतवादी एका खोलीत बसलेले आहेत. ते खोलीत बसून जल्लोष करत आहेत. त्यातील एक दहशतवादी गाणं आहे आणि बाकी त्याला साथ देत आहेत. याचवेळी त्यातील एक दहशतवादी सेल्फी घेताे तेव्हाच त्या ठिकाणी स्फोट झाल्याचे दिसत आहे. या बाॅम्बस्फोटात दहशतवाद्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पसरले आहेत. सध्या हा व्हिडीओसोशल मीडियावर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. परंतु अनेकांन माहीत नाही की हा व्हिडीओ 2016 सालचा असून खूप जुना आाहे. त्यामुळे काहीजण हा व्हिडीओ अलीकडचा आहे असे समजून त्याला व्हायरल करत आहेत.

काय आहे व्हिडीओमागचे सत्य

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर व्हिडीओ हा 2016 चा आहे. मुख्य म्हणजे हे दहशतवादी सीरियातील ISIS या दहशतवादी संघटनेचे आहेत अशीही माहिती समोर आली आहे.