Video : पुण्यात मंगळवार पेठेतील टॉवर अन् संचेती ब्रिज येथील होर्डिंग कोसळलं

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कहर माजवला असून, यात दोन भीषण घटना घडल्या आहेत. मंगळवार पेठेत इमारतीवर उभारलेला टॉवर आणि संचेती ब्रिज जवळील होर्डिंग रस्त्यावर कोसळले. सुदैवाने लॉकडाऊन कोणीही जखमी झाले नाही. अन्यथा परत एकदा शहरात शाहीर अमर शेख चौकातील घटनेची पुनरावृत्ती झाली असती.

कोरोना विषाणूमुळे राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे कोणालाही बाहेर पडता येत नाही. त्यामुळे गर्दीने भरलेली रस्ते सुमसाम आहेत. दरम्यान आज अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुसाट वारे आणि गारांचा मारा काही वेळ सुरू होता. पाऊस सुरू झाल्यानंतर अचानक मंगळवार पेठ येथील सदाआनंद नगर भागातील एका इमारतीवर मोबाईल टॉवरचा सांगडा उभा होता. तो सांगाडा कोसळला. सुदैवाने तो सांगाडा तुटला नाही. तो लोमकळत इमरतीवरच राहिला आहे. त्यामुळे कहाणी दुर्घटना घडली नाही. तर संचेती चौकात लावलेले मोठे होर्डिंग रस्त्यावर कोसळले. ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडले. त्यामुळे रास्ता बंद झाला आहे.

तर शहरात कहाणी भागात झाडपड्डीच्या 50 हुन अधिक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली आहेत. यात देखील कुठे काही दुर्घटना घडलेली नाही.

मोबाईलचे टॉवर आणि संचेती चौकातील होर्डिंग काढण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या विभागाला कळवले असून त्याचे काम काढण्याचे सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.