आश्‍चर्यकारक ! धावपट्टी दिसली नाही तरीही ‘हुश्शार’ पायलटनं ‘सुखरूप’ उतरवलं विमान (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विमान धावपट्टीवर उरताना अनेक अपघात घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. असाच एक थरारक प्रकार ब्रिटनमध्ये घडला. गुरुवारी ब्रिटनमध्ये दुबईच्या एमिरेट्स विमानाने थरारक लँडिग केले. रनवेपासून कमी उंचावर ढग असताना हा प्रकार घडला. परंतू विमानच्या पायलटने सुखरुप विमान उतरवल्याने दुर्घटना टळली.

दुबईचे एमिरेट्सचे विमान ब्रिटनमध्ये गुरुवारी लँडिंग करत होते, या दरम्यान विमान उतरत असलेल्या रनवेपासून कमी उंचीवर ढग असताना विमानाच्या पायलटने ढगातून येत विमान रनवेवर सुखरुप उतरवले.

रनवेपासून जास्त उंचीवर ढग असतात, त्यामुळे दृष्यमानता कमी असल्यास रनवेवर उतरवण्यात येणारी विमाने माघारी फिरवली जातात किंवा इतर एखाद्या जवळच्या विमानतळावर उतरवली जातात.

परंतू काल झालेल्या प्रकारात अनुकूल परिस्थिती नसताना देखील अरब एमिरेट्सच्या पायलटने धैर्याने विमान रनवेवर उतरवले. या घटनेनंतरचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाली. कंपनीने हा थरारक प्रकाराचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त