शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’

ठाणेः पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे विधानसभा संघटक एकनाथ पाटील (Eknath Patil) यांनी तोंडावर थुंकून शिवीगाळ अन् मारहाण केल्याची तक्रार त्यांची सून हर्षदा पाटील यांनी केली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून सादर करत त्यांनी सासरे एकनाथ पाटील (Eknath Patil) यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान याप्रकरणात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही उडी घेतली आहे.

 

विवाहित महिला का घालतात जोडवे ? आरोग्याचे ‘हे’ होतात ३ फायदे

 

विशेष म्हणजे वाघ यांनाही ट्विट करुन व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता विकृतांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, सासऱ्यानेही व्हिडिओचे स्पष्टीकरण दिले आहे. सून हर्षदा ज्या व्हिडिओचा दाखला देत आहेत, तो 2 वर्षांपूर्वीचा आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या घरगुती वादाचा गैरफायदा घेऊन माझ्या बदनामीचा डाव रचल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 

कल्याण परिसरातील भोपर गावात राहणाऱ्या हर्षदा या एकनाथ पाटील ( Eknath Patil ) यांच्या सूनबाई आहेत. सासरे वारंवार त्रास देतात, शिवीगाळ व मारहाण करतात, इतकेच नाही, तर हर्षदा यांच्या मुलीच्या अंगावरही धावून जातात अशी तक्रार त्यांनी केली आहे. एकनाथ पाटील हे हर्षदा यांच्या तोंडावर थुंकल्याचा त्यांचा आरोप असून, पुराव्यादाखल त्यांनी व्हिडिओ दाखवला. सासऱ्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती शिवसेनेच्या नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी दखल घेतली नसल्याचे हर्षदा यांचे म्हणणे आहे. पोलीसही एकनाथ यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेत नसल्याने अखेरीस हर्षदा यांनी डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे दाद मागितली. चव्हाण यांनी भाजप नगरसेविका रविना माळी यांच्यासह हर्षदा यांना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे पाठवले. हर्षदा पाटील यांची सादर केलेल्या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई केली जाईल, असे पानसरे यांनी सांगितले आहे.

 

Also Read This : 

 

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 3378 जागांसाठी भरती; जाणून घ्या

 

 

Maratha Reservation : चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सवाल, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर येईपर्यंत मराठा समाजानं थांबायचं का?’

 

‘कोलेस्ट्रॉल’ कमी करण्यासाठी जीवनशैलीत व आहारात करा ‘हे’ बदल

 

कोरोना काळात तुम्ही सुद्धा कपडे धुताना आणि सुकवताना ‘या’ चुका करता का? होऊ शकते Bacterial Infection

 

काळ मीठ पोटाच्या अनेक आजारांसाठी खुपच लाभादायक, जाणून घ्या