# Video Vairal : बॅंकॉंक मध्ये कपडे विकते ‘ही ‘अभिनेत्री’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमध्ये आपल्या प्रतिभेने आपलं विशेष स्थान निर्माण करणारी अदाकार नोरा फतेहीचा डान्स चाहत्यांनमध्ये खूप हिट आहे. सोशल मीडियावर नोराचा एक डान्स खूप व्हायरल होत आहे. तिचा आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये ती बॅंकॉंकच्या बाजार मध्ये कपडे विकतांना दिसते आहे. नोराच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत १ लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितला आहे.

https://www.instagram.com/p/BykdwPLAzpz/?utm_source=ig_embed

नोराने  ‘बाहुबली’, ‘स्त्री’, आणि  ‘सत्यमेव जयते’ अशा चित्रपटांमध्ये आयटम सॉंग  करून खूप चर्चेत आली आहे. नोराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेयर करत लिहिले की, तुम्ही मला बॅंकॉंकच्या स्ट्रीट मार्केट मध्ये शॉर्ट्स विकतांना स्पॉट करू शकता का. बॉलीवूड रिपोर्टनुसार काही दिवसांपासून नोराचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नोराच्या फॅन पेज वर शेयर केला आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर नोराला खूप लोक ट्रोल करत आहेत.तिला एका यूजरने रमजान मध्ये डान्स न करण्याचा सल्ला दिला होता. या व्हिडिओला कमेंट करत एका यूजरने लिहिले की, थोडी तरी लाज धर, या महिन्याची इज्जत नाही करू शकत तर बेइज्जती तरी करू नकोस.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like