कतरिना कैफला विकी कौशलनं घातली लग्नाची मागणी, ‘भाईजान’ सलमाननं दिली ही रिअ‍ॅक्शन (व्हिडीओ)

मुंबई, ता. ३१: पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी सलमान खानचे चाहते त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सलमान खानचे बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले आहे. त्यात अभिनेत्री कतरिना कैफचाही (katrina kaif) समावेश आहे. एकेकाळी बॉलिवूडचा दबंग खान सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या (katrina kaif) अफेयरची चर्चा होती. कतरिना कैफचे नाव रणबीर कपूरसोबतही चर्चेत होते. मात्र आता ती उरी फेम अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky kaushal ) रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. बऱ्याच इव्हेंट्स आणि पार्ट्यांमध्ये ते दोघे एकत्र पाहायला मिळतात. मात्र त्या दोघांनी कधीच रिलेशनशीपमध्ये असल्याची कबुली दिली नाही.

 

https://www.instagram.com/p/CPanPL4BEzy/?utm_source=ig_web_copy_link

 

 

दरम्यान, आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत विकी कौशल कतरिना कैफला लग्नाची मागणी घालताना दिसतो आहे. त्यानंतर कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानची देखील रिअ‍ॅक्शन समोर आली आहे. हा सगळा एका पुरस्कार सोहळ्यात घडला आहे. या सोहळ्यातील विकी कौशल आणि कतरिना कैफचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

 

या व्हिडीओत विकी कौशल (Vicky kaushal ) कतरिना कैफला म्हणतो आहे की “सध्या लग्नसराई आहे त्यामुळे मला विचारावेसे वाटतेय. त्यावर कतरिना कैफ म्हणाली काय? त्यावर विकीने म्हटले “मुझसे शादी करोगी?…” यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सलमान खानने बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर डोक टेकवले. विक्कीच्या मागणीवर कतरीना म्हणते, ‘माझ्यात हिंमत नाही.’ कतरिनाचे हे उत्तर ऐकून सलमान अवाक होऊन स्टेजकडे पाहताना दिसतो आहे. असे असले तरी मात्र सलमान भाईजानने लग्नाची मागणी घालण्याआधीच विकी कौशलने बाजी मारली आहे.

Also Read This : 

 

Pune : सिंहगड परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

 

Disinfect Home : ‘कोरोना व्हायरस’च्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी अशाप्रकारे करा घर ‘डिसइन्फेक्ट’, जाणून घ्या

 

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

 

तुम्ही जंगल जलेबी खाल्ली आहे का? आहेत ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच