#VideoViral : 64 वर्षांच्या ‘या’ अभिनेत्याचा वर्कआऊट आणि बॉडी पाहून चकित व्हाल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार अनुपम खेर 64 वर्षांचे झाले आहेत. 7 मार्च रोजी अनुपम खेर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. एवढं वय झालं असूनही त्यांची बॉडी पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. सध्या त्यांचा असाच एक हैराण करणारा व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल हेताना दिसत आहे.

या व्हिडीओत अनुपम खेर जीममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. व्हिडीओत त्यांची जी बॉडी दिसत आहे ती सर्वांनाच चकित करताना दिसत आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसत आहे. अनुपम खेर जीममध्ये बॅकची एक्सरसाईज करताना दिसत असून ते पाठमोरे असल्याचे दिसते. यातून स्पष्ट होते की, अनुपम 64 वर्षांचे असूनही किती फिट आहेत.

अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ एका दिवसात जवळपास 3 लाख लोकांनी पाहिला आहे. अनुपम खेर हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्याच इंस्टा अकाऊंटवरून शेअर केलेला हा वर्कआऊटचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनुपम खेर यांचे इंस्टावर तब्बल 2.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. याशिवाय अनुपम खेर 136 लोकांना फॉलो करतात. हिमाचल प्रदेशात जन्मलेले अनुपम खेर यांची गणती अशा कलाकारांमध्ये होते जे भलेही सपोर्टींग कलाकाराचा रोल करत असतील परंतु त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. अनुपम खेर यांच्याकडे एक उत्तम अभिनेता म्हणून पाहिलं जातं. त्यांनी अनेक हीट सिनेमात काम केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !

अवघ्या चार तासांच्या बाळावर डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

गर्भवती, स्तनदा मातांना लोकलमध्ये मिळू शकते राखीव जागा