#VideoViral : ‘या’ अभिनेत्रीला गर्दीमध्ये जबरा फॅनने केला जबरा KISS

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस मायली सायरससोबत एका चाहत्याने गैरवर्तणूक केल्याचे समोर आले आहे. सध्या याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. मायलीच्या एका चाहत्याने गर्दीचा फायदा घेत तिला जबरदस्तीने किस केलं. या व्हिडीओत त्याची गैरवर्तणूक दिसूनही येते आहे. शिवाय तिथे उपस्थित सेक्युरीटी गार्ड त्या माणसाला बाजूला करतो. हा व्हिडीओ सोशलवर वाऱ्यासारखा पसरत आहे.

रिपोर्ट्सनुसार, मायली बार्सिलोनामध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. ती आपला पती लियाम हेम्सवर्थ सोबत हॉटेलच्या बाहेर पडली होती. यावेळी तिथे मीडियाचा लवाजमा आणि खूपच गर्दी दिसत होती. यावेळीच एका चाहत्याने मायलीला आपल्या जवळ ओढत तिला जबरदस्तीने किस केलं. यानंतर या मायलीने जबरदस्तीने किस करणाऱ्या व्यक्तीवर सडकून टीकाही केली आहे. हा व्हिडीओ तिने तिच्या इंस्टावर शेअर करत लिहिले आहे की, “मी या घटनेमुळे खूपच निराश आहे. काही चाहत्यांना हे कळायला हवे की, व्यक्तीगत स्पेस काय असते. तुम्ही त्याचा आदरही करायला हवा. तुम्हाला असा स्पर्श करण्याचा किंवा थेट किस करण्याचा अधिकार दिलाच कोणी ? मी हा विचार करून घाबरले आहे की, लियाम माझ्यासोबत नसता तर काय झालं असतं.” ती या प्रसंगाने खूपच घाबरल्याचे दिसत आहे.

मायली सायरस डिझनी चॅनेल सीरीज हैना मॉण्टेनामध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासाठी विशेष ओळखली जाते. सायरसने 2008 मध्ये बोल्ड नावाच्या सिनेमात अभिनय केला आहे.