Video : भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पाहण्यासाठी आलेल्या ‘शौकीन’ मल्ल्याला पाहताच क्रिकेट फॅन्सकडून ‘चोर-चोर’चा नारा

लंडन : वृत्तसंस्था – भारतीय बँकांचे कर्ज बुडवणारा आणि सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असणारा बिझनेसमॅन विजय माल्ल्या रविवारी पु्न्हा एकदा वाईट अनुभवाचा शिकार झाला आहे. माल्ल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच पाहण्यासाठी ओवल मैदानात गेला होता. परंतु तेथे उपस्थित लोकांनी थेट त्याला चोर म्हणून हाका मारल्याचे दिसून आले.

सध्या विजय माल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, काही माणसांच्या गर्दीत विजय माल्ल्या दिसत आहे. विशेष बाब अशी की, हे लोक त्याला चोर म्हणून संबोधत आहेत. एकाने तर त्याला थेट असेही म्हटले आहे की, मर्द बन आणि देशाची माफी माग. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर सर्वत्र वाऱ्यासारखा पसरत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने माल्ल्याचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. आजच(सोमवार दि 10 जून) पोस्ट केलेल्या या व्हिडीओला दिवस सरायच्या आतच एका लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया मॅचच्या दिवशी विजय माल्ल्याने त्याचा मुलगा सिद्दार्थ माल्ल्याचा फोटो काढला आणि तो ट्विटही केला होता. माल्ल्या सध्या ब्रिटेनमध्ये प्रत्यार्पणाच्या कार्यवाहीला सामोरा जात आहे. ६३ वर्षांच्या विजय माल्ल्याने भारतीय बँकांकडून ९००० कोटींचं कर्ज घेतलं होतं. माल्ल्या हे कर्ज फेडण्यास अक्षम झाल्याने २ मार्च २०१६ मध्ये तो देश सोडून पळून गेला. भारताने २०१७ रोजी माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. माल्ल्या सध्या जामीनावर बाहेर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

 

Loading...
You might also like