भाईजान सलमान खानने आई सलमासोबत भारी ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सलमान खान आपल्या परिवारामधील सर्व मेंबर्ससोबत स्‍पेशल बॉन्‍ड शेयर करत असतो. परिवाराशी संबंधित काही फोटो तो पोस्ट करत असतो आणि ते फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. पुन्हा एकदा ‘दबंग ३’ अॅक्टरने एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो आई सलमासोबत डान्स करतांना दिसतो आहे. ते दोघे हॉलीवूडचे हिट पॉप सॉन्‍ग ‘सियास चीप थ्रिल्‍स’ या गाण्यावर डान्स करतांना दिसता आहेत व्हिडीओ बघून असे दिसून येते की, आई आणि सलमान खान मध्ये अशी आहे बॉण्डिंग.

https://www.instagram.com/p/B0NphR1FQ-r/?utm_source=ig_embed

शेवटी सलमायांनी व्हिडीओ शूट करणाऱ्याला व्हिडीओ बंद करण्यास सांगितले. सलमानने व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले की, ‘मां कह रही हैं कि बंद करो ये नाच गाना।’ या व्हिडीओवर त्याचे चाहते आणि काही सेलेब्स वरुण धवन, सोफी चौधरी आणि ईशा गुप्‍ताने कमेंट केली आहे. सुपरस्टार आपला पुतण्या आहिल आणि योहानसोबत नेहमी सोशल मीडियावर व्हिडीओ शेयर करत असतो.

आरोग्यविषयक वृत्त –