Video Viral | ‘विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचं डोकं फोडून टाका’, लाठीचार्ज करण्यापूर्वी पोलिसांना आदेश देणार्‍या उप न्यायदंडाधिकार्‍यांचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Video Viral | कर्नाल येथे भाजपची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर व भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या बैठकीत हजर होते. या बैठकीला विरोध करण्यासाठी काही शेतकरी एक महामार्गावरून निघाले होते. त्यावेळी वाहतुकीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या गटावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. शनिवारी हि घटना घडली असून यामध्ये १० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, लाठी चार्ज करण्यापूर्वीचा कर्नालचे उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते पोलिसांना विरोध करणाऱ्यांचे डोके तोडण्यास सांगत आहेत. यामुळे कर्नालचे वातावरण चिघळले गेले असून पोलिसांच्या कारवाई विरोधात इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने पोहोचून रस्ता रोको केला. दिल्ली आणि चंदीगडला जोडणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी (Video Viral) झाली होती.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

उप न्यायदंडाधिकारी आयुष सिन्हा हे शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांना लेखी आदेशही देत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहेत.
अनेक पोलिसांसमोर आयुष उभे असून हे अगदी स्पष्ट आहे, तो कोणीही असो, कुठलाही असो त्याला जाऊ देऊ नका.
येथून कोणालाही पुढे जाऊ देऊ नका. आपली काठी उचला आणि जोरात मारा.
कोणत्याही सूचनांची आवश्यकता नाही, फक्त जोरात मारायचे आहे.
इथे एक जरी आंदोलक दिसला तर त्याचे डोके फुटलेले पाहिजे असे त्यांनी म्हंटले एवढच नाही तर काही शंका आहे का ? असे पोलिसांना विचारले पोलिसांनी नाही सर असं उत्तर दिल्याचंही या व्हिडिओत दिसत आहे.

शेकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेक जिल्ह्यातील शेतकरी घटनास्थळी पोहोचले आणि थे रास्ता रोको केला. दिल्ली आणि चंदीगडला जोडणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तोच व्हिडीओ भाजपनेते वरुण गांधी यांनीही शेअर करत मला आशा आहे की हा व्हिडिओ एडिट केला गेला असेल आणि उप न्यायदंडाधिकाऱ्याने तसे म्हटले नाही अन्यथा लोकशाही असलेल्या भारतात आमच्या नागरिकांसोबत असे करणे अस्वीकार्य आहे.असे त्यांनी म्हंटले आहे.

पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे रक्त सांडले: राहुल गांधी
कर्नाल येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी हरियाणातील भाजपा-जेजेपी राजवटीची तुलना ‘जनरल डायर सरकारशी’ केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लाठीहल्ल्यात झालेल्या रक्तबंबाळ कपड्यांसह एका शेतकऱ्याचे छायाचित्र ट्विट केले आहे. त्या फोटो खाली ‘पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे रक्त सांडले असून, भारताची मान लाजेने झुकली आहे’, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Web Titel :  Video Viral video break heads of protestors karnal sdm tells cops deployed protesting farmers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

Arman Kohli | ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीला NCB कडून अटक