नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे – पाटील ‘बाला’वर थिरकले, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विश्वास नांगरे-पाटील एकदम वेगळ्या मूडमध्ये दिसत असून ते चक्क नाचत आहेत. एका खासगी कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याचे दिसत असून नांगरे-पाटील अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल्ल 4’ चित्रपटातील ‘बाला’ गाण्यावर नाचत आहेत. विश्वास नांगरे पाटील यांचा हा वेगळा अंदाज पाहून नेटकरीही त्यांचं कौतूक करत आहेत.

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा हा व्हिडिओ गुरुवारी (दि.26) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अत्यंत शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाणाऱ्या नांगरे पाटील यांचा बाला गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्याला पसंती मिळत आहे.

26/11 च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी ताजमहल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी विश्वास नांगरे-पाटील हे एक होते. तसेच तरुणांचे आदर्श म्हणून देखील विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाहिले जाते. नवीन विद्यार्थ्याना यूपीएससी परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. या आधी विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक पद भूषविले होते. सध्या ते नाशिक पोलीस आयुक्तपदाचा कारभार सांभाळत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/