#Video : चार भिंतीत बसून राहायला मी काय कारकून आहे ? : खा. उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – उदयनराजे हे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार असतील अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर विचारले असता उदयनराजेंनी ‘चार भिंतीमध्ये बसून काम करायला मी काय कारकून वाटलो काय, आपल्या जे जमत नाही ते करायचे नाही’ असे म्हणत त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचे दावेदार नसल्याचे स्पष्ट केले. आज सातारा येथे उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या स्टाईलने पत्रकारांना उत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे यांना मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा म्हणून पुढे केले जात आहे. यावर भाष्य करताना उदयनराजे म्हणाले. हा विचार पंधरा वर्षापूर्वी करायला पाहिजे होता. तसाच विचार केला असता तर फायदा झाला असता. मला जर मुख्यमंत्री होयचे असते तर मी अधीपासूनच तशी पावले टाकायला सुरुवात केली असती. सध्या प्रत्येकालाच मीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नीरा देवधर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता टीका केली. स्वयंघोषित भगिरथाने जाणीपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने काही तालुके पाण्यापासून वंचित राहिले. त्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी १४ वर्षे पाणी बारामतीला पळवले. तसेच जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.

आरोग्य विषयक वृत्त

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

कामसूत्र फॉलो करा, संभोगसुखाचा मिळेल पूर्ण आनंद

रोज सकाळी कोमट पाणी प्या, होतील ‘हे’ १० फायदे