सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार कोणत्या न कोणत्या तरी कारणावरुन नेहमीच चर्चेत असतो. मग त्याचा चित्रपट असो किंवा वेगळे कोणतेही कारण असो त्याच्या चर्चा कायम चालूच राहतात. आता सलमानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान गर्लफ्रेंड वंतूर आणि मलायका व अरबाजचा मुलगा अहराह खानसोबत मध्यरात्री सायकल चालविताना दिसत आहे. मंगळवारी रात्री २.३० वाजता सलमान सायकल चालविताना दिसला.

सलमानचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होत आहे. चाहत्यांना या दबंग खानचा हा अंदाज खूप आवडला आहे. त्याच्या अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले आहे. सध्या सलमान खानची चर्चा जोरदार आहे. भारत चित्रपटानंतर सलमान खूपच चर्चेत आला आहे. सलमान खानचा भारत चित्रपटाने ७ दिवसात तब्बल १६७ करोड रुपयाची कमाई केली आहे. बाहेरच्या देशामध्ये देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. नुकतीच इंडियाच्या टिमने देखील हा चित्रपट पहायला हजेरी लावली होती.

सलमानने खास कलाकारांसाठी स्पेशल चित्रपटाची स्क्रिनिंग ठेवली होती. त्याचा भारत चित्रपट पहायला अनेक कलाकार आले होते. अनेकांनी भारत चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती. या चित्रटाला प्रदर्शित होऊन आठवडा होऊन गेला तरी देखील हा चित्रपट पहाण्यासाठी लोकांची गर्दी कमी झाली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like