Video शेअर करत भाजपाचा आरोप; म्हणाले – ‘शिवभोजन घेण्यासाठी गेलेल्या महिलेला केंद्रचालकानं केली मारहाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारीमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवात केली. यानंतर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत मुख्यंमत्री ठाकरे यांनी शिवभोजन थाळी १ महिना मोफत देण्याची घोषणा केल्याने अनेक लोक याचा लाभ घेत आहेत. मात्र शिवभोजन घेण्यासाठी केंद्रावर गेलेल्या एका वृद्ध महिलेला केंद्र चालकाने मारहाण केली आहे. असा गंभीर आरोप भाजपने केला आहे.

येथील, शिवभोजन केंद्रावर झालेल्या किरकोळ कारणावरून एका महिलेला हाकलून लावण्यात आले आहे. हा व्हिडीओ नांदेड बसस्थानकाजवळ असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या शिवभोजन केंद्रातील असल्याचा दावा आशिष मेरखेड यांनी केला आहे. या प्रकारावरून अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील एक ट्विट रिट्विट करून प्रसारित केलं आहे.

दरम्यान, शिवभोजन घ्यायला गेलेल्या वृद्धेला मारहाण झाली आहे. हे असे मिळतेय गरिबांना ‘शिवभोजन’. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात टक्केवारी सेनेची अशी वाटमारी सुरू आहे, असा आरोप करत अतुल भातखळकर यांनी प्रकारारावर प्रतिक्रिया देत ट्विट केलं आहे.