Video : यजुवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीनं केला ‘बुर्ज खलिफा’वर तुफान डान्स ! व्हिडीओ पहातच बसाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरसीबीचा (RCB) क्रिकेटर यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. धनश्रीनं पुन्हा एकदा धमाकेदार डान्स करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या धनश्री दुबईत (Dubai) असून आयपीएल 2020 (IPL-2020) सामन्यात ययुवेंद्रला प्रोत्साहित करताना दिसत आहे.

धनश्रीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या बुर्ज खलिफा (Burj Khalifa) या सुपरहिट गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिनं केलेल्या डान्स स्टेप्सनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड कलरचा मिनी ड्रेस घातला आहे.

व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, जेव्हा कायली जेन्नर (Kylie Jenner)देखील या गाण्याच्या प्रेमात पडते. इतकंच नाही तर तिनंही इतरांनी या गाण्यावर डान्स करत तो इंस्टावरून शेअर करा आणि अक्षय कुमारला टॅग करा असं आवाहन देखील केलं आहे.

धनश्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. काही तासातच या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. अनेकांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

धनश्रीबद्दल बोलायचं झालं तर ती एक डॉक्टर आहे सोबतच ती एक डान्सरही आहे. युट्युबवरही तिला 19 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. धनश्री कायमच आपले फोटो आणि डान्स व्हिडीओ यामुळं चर्चेत असते.

You might also like