विधानसभेच्या कॅंटीनमध्ये चमत्कार ! ‘मटकी’च्या उसळीत, ‘चिकन’ची मिसळ

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. अशा या अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी विधानसभेच्या कॅंटीनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना जेवताना मटकीच्या उसळीत हे चिकनचे तुकडे आढळले. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये महत्वाच्या व्यक्तींची मोठी गर्दी असते. अशातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळीची थाळी मागवली होती. यावेळी त्यांना या उसळीमध्ये चिकनचे तुकडे आढळून आले. मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असून तक्रार दाखल केली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मनोज लाखे यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कॅन्टिनमध्ये आमदार, नेते, पोलीस आणि पत्रकार, तसेच महत्वाच्या लोकांची मोठी गर्दी असते. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान कँटीन पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनोज लाखे यांची माफी मागितली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय