Vidhan Parishad Election 2022 | ठाकरे सरकारमध्ये फोडाफोडी ! काँग्रेसकडून थेट शिवसेनेच्या आमदारांना फोन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vidhan Parishad Election 2022 | अवघ्या काही दिवसांवर विधान परिषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे. या निवडणूकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि भाजपकडून (BJP) खबरदारी घेतली जात आहे. भाजप शिवसेनेचे आमदार फोडेल याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना होती. मात्र आता सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना (Independent MLA) संपर्क केला जात आहे. विशेष म्हणजे मतांची जुळवाजुळव करण्यात काहीही गैर नसल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. काँग्रेसकडून शिवसेनेच्या समर्थक आमदारांशी संपर्क साधला जात असल्याने शिवसेनेसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. (Vidhan Parishad Election 2022)

 

राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election) अपमानजनक पराभव झाल्यानंतर शिवसेनवर आता दुसरंच संकट ओढावलं आहे. काँग्रेसने या विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या रुपाने अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला आहे. हाच उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला आणखी 10 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मतांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिलेले सहा उमेदवार निवडून आणायचे तर गरज आहे 162 मतांची आणि हातात आहेत 152 मंत. कारण अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना अद्यापही मतदानाची परवानगी मिळालेली नाही.

 

अपक्षांच्या मतांवर काँग्रेसचा डोळा
विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. त्यामुळे 55 आमदार असलेल्या शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येतात, तर राष्ट्रवादीलाही चार अपक्षांच्या पाठिंब्याची गरज पडेल आणि त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. संजय मामा शिंदे (Sanjay Mama Shinde), देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar), राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar) असे अजित पवारांच्या (Ajit Pawar) मर्जीतले काही अपक्ष आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीला अडचण येणार नाही. मात्र काँग्रेसला अडचण येणार आहे. कारण काँग्रेसला भाजपच्या प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर मात करण्यासाठी आणखी 10 मतांची आवश्यकता आहे. आपले दोन आमदार सहज निवडून आणण्याची क्षमता शिवसेनेकडे आहे. तसेच त्यांना काही अपक्षांचा पाठिंबा आहे. याच अपक्ष मतांवर काँग्रेसचा डोळा आहे.

काँग्रेसकडून शिवसेनेचे 6 मतं फोडण्याच्या हालचाली
राज्यसभेत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आपापलं पहा असा थेट इशारा दिला आहे. दोन उमेदवार निवडून आणल्यानंतरही शिवसेनेकडे शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh), बच्चू कडू (Bachchu Kadu), आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal), गीता जैन (Geeta Jain), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) अशा अपक्षांची मते राहतात. काँग्रेस या अपक्षांवर नजर ठेवून हालाचील सुरु केल्या आहेत. तसेच बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असल्याने त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेना घेणार आहे. याचाच अर्थ शिवसेनेला पाठिंबा असलेल्या 6 अतिरिक्त आमदारांना फोडण्याच्या हालचाली काँग्रेस करताना दिसत आहे.

 

आकड्यांचा खेल कधीही बदलू शकतो
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेसने भाई जगताप तर भाजपने प्रसाद लाड हे अतिरिक्त उमेदवार दिले आहेत.
प्रसाद लाड यांना विजयी होण्यासाठी आणखी 13 मतांची गरज आहे. तर भाई जगताप यांना विजयी होण्यासाठी 10 मतांची आवश्यकता आहे.
भाजपचा आत्मविश्वास पाहता त्यांचे सहा उमेदवार निवडून येतील असं चित्र भाजपच्या नेत्यांनी तयार केलं आहे.
पण हा आकड्यांचा खेल असून तो कधीही बदलू शकतो.

शिवसेनेची मोठी अडचण
राज्यसभेत पराभव झाल्यानंतरही शिवसेनेला मित्रपक्षांना फार काही बोलता आलं नाही. यामुळे सगळ्यात मोठी अडचण शिवसेनेची झाली आहे.
कारण सरकार त्यांच्याच बळावर उभं आहे. आता सरकार टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांची फोडाफोडी काँग्रेसने सुरु केली आहे.
पण महाविकास आघाडीतील फोडाफोडी ही सरकार अडचणीत आणणारी ठरु शकते
का, शिवसेनेची मतं फुटू शकतात का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळतील.

 

Web Title :- Vidhan Parishad Election 2022 | maharashtra vidhan parishad election 2022 congress needs 10 votes may call shivsena supporter independent mlas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार यश दत्ता होळेकर व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 83 वी कारवाई

 

Post Office MIS | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत होईल 5000 रूपयांचे मंथली इन्कम, सरकार देते गॅरंटी, जाणून घ्या डिटेल्स

 

Maharashtra MLC Election 2022 | नवाब मलिक, अनिल देशमुखांना मताचा अधिकार हाय कोर्टानं नाकारला; खडसेंचं गणित बिघडणार?