Vidhan Parishad Election 2022 | भाजप 6 जागा लढवण्यावर ठाम ! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सदाभाऊ खोत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLC Election 2022 | राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) विजय मिळवल्यानंतर भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर 20 जुलै रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुका (Vidhan Parishad Election 2022) होणार आहेत. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) यावेळी बॅकफूटवर जावं लागलं. धनंजय महाडिकांच्या (Dhananjay Mahadik) विजयाने भाजपचे पारडं जड झाले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) भाजपने आपले सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2022) गुप्त मतदान असल्याने भाजपला मतं पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे भाजपने पाच जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाच जागा पक्ष लढवणार आहे. तर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना अपक्ष (Independent) म्हणून उतरवून भाजपने या देखील निवडणुकीत रंगत आणली आहे.

 

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून (Congress) ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसने एक उमेदवार मागे घेतल्यास भाजपनेही उमेदवार मागे घ्यावा, अशी ऑफर असल्याची चर्चा आहे. परंतु असं झाल्यास सदाभाऊ खोत यांना माघार घ्यावी लागणार, हे स्पष्ट झालंय. मात्र, सध्या भाजप सहा जागांवर लढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

सत्ताधारी महाविकास आघाडीने देखील सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे 10 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. सदाभाऊ खोत यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने दोघांमध्ये खलबतं झाली. यानंतर सहा जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याचे स्पष्ट झाले. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाली. यानंतर फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना काही काळ कार्यालयातच बसण्यास सांगितले.

 

देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातील चाणक्य असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले. कोरोना काळात पायाला भिंगरी लावून ते फिरले.
प्रत्येक आमदाराला वाटतं कार्यक्षम मुख्यमंत्री (CM) मिळावा.
त्यामुळे फडणवीसांनी पुन्हा राज्याची धुरा सांभाळावी अशी अपेक्षा सदाभाऊ यांनी व्यक्त केली.

 

Web Title :- Vidhan Parishad Election 2022 | Vidhan Parishad Election 2022 sadabhau khot meets devendra fadnavis over mlc election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा