Vidhan Parishad Election | रोहित पवार यांचा BJP ला कडक इशारा, म्हणाले – ‘उद्या भाजपलाच धक्का बसू शकतो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Vidhan Parishad Election | सर्व आमदार विश्वासाने मतदान करतील, काँग्रेसला (Congress) काही मते कमी आहेत त्यांना शिवसेना मदत करेल. तसेच अपक्ष आणि कदाचित भाजपचे (BJP) देखील अनेक आमदार राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील असे समिकरण उद्या आपल्याला पाहायला मिळेल. भाजपलाच काही ठराविक आमदारांकडून आणि अपक्ष आमदारांकडून उद्या धक्का बसण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य उद्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे आमदार (NCP MLA) रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे. (Vidhan Parishad Election)

 

उद्या सोमवारी 20 जून रोजी राज्य विधान परिषदेची निवडणूक (MLC Election 2022) होत आहे. सर्व राजकीय पक्ष आपआपले आमदार सांभाळताना दिसत आहेत. मताची फोडाफोडी होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे, यादरम्यान महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या निवडणूकीवर आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणूकीत अपेक्षा वेगळ्या होत्या. शिवसेनेचे एक मत बाद झाले, आणि समिकरण बदलले होते. भाजपने वेगवेगळे डाव टाकून विजय मिळवला, मात्र उद्याच्या विधान परिषद निवडणूकीत भाजप काय करू शकते ते सगळ्यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे काळजी घेत निवडणूक लढली जाईल.

 

Web Title :- Vidhan Parishad Election | ncp mla rohit pawar on
vidhan parishad election 2022 bjp mla votting for ncp congress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा