PM मोदींचा आदेश ! मंत्री बनायचं मग विधानसभा लढवा, विधानपरिषद सदस्य मंत्री बनणार नाहीत, अनेकांची ‘तारांबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणतीही निवडणूक न लढवता थेट मागच्या दाराने अर्थात विधानपरिषदेच्या माध्यमातून मंत्रीपद पदरात पाडून घेणाऱ्यांची धाकधूक वाढणार आहे. कारण संसदेत मागच्या दारातून म्हणजेच राज्यसभेतून मंत्री झालेल्या खासदारांना निवडणूक लढवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. हा पॅटर्न आता महाराष्ट्रातही लागू होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक न लढवता थेट विधानपरिषदेच्या माध्यमातून मंत्री झालेल्या नेत्यांना आता विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.

सध्याच्या मंत्रीमंडळात चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, रणजित पाटील या विधानपरिषद आमदारांचा समावेश आहे. त्यांमुळे यापुढे मंत्री व्हायचे असेल तर विधानसभा निवडणूक जिंकणे आवश्यक आहे, असा निरोप विधानपरिषदेच्या दारातून मंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेल्या आमदारांना देण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राज्यसभेमार्फत मंत्री झालेल्या खासदारांना हा संदेश दिला होता. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात देखील मोदींच्या नव्या पॅटर्नची अंमलबजावणी होणार आहे. त्यांमुळे विधानपरिषदेतून मंत्रिपद मिळवणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

Visit : policenama.com