मुंबई : Vidhan Parishad Sabhapati | लोकसभेत राज्यात झालेला पराभव पाहता विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) सत्ता गेल्यास विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात कंट्रोल कायम राहावा असा भाजपचा प्लान आहे. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदे (Ram Shinde), प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि निरंजन डावखरेंची (Niranjan Davkhare) नावे आघाडीवर आहेत. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात विधानपरिषदेचा सभापती निवडून आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्याबाबत भाजपाकडून (BJP) मोर्चेबांधणी सुरु आहे.
२०२२ मध्ये रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपला. ते निवृत्त झाले. पण त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा परिषदेवर पाठवले. ते निवडून आले. पण सभागृहाचे सभापतीपद ८ जुलै २०२२ पासून रिक्त आहे. पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकानंतर होईल त्यामुळे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातच आपला सभापती बसवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (Vidhan Parishad Sabhapati)
सत्तेत असलेल्या घटक पक्षांपैकी कोणीही भाजपच्या उमेदवाराला विरोध करणार नाही.
राम शिंदे पुढील सभापती असू शकतात. ते धनगर समाजाचे (Dhangar Samaj) आहेत.
लोकसभा निवडणुकीत हा समाज महायुतीपासून (Mahayuti) दूर गेला त्यामुळे भाजप असा निर्णय घेऊ शकते.
राज्यात धनगर समाजाची लोकसंख्या १० टक्के आहे.
शिंदेंना संधी देऊन भाजप विधानसभेच्या तोंडावर धनगर समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
How to Get Railway Shop Tender | रेल्वे प्लॅटफॉर्मवर कसे उघडावे दुकान, किती असते भाडे,
कसे मिळते टेंडर, जाणून घ्या प्रक्रिया
Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन