विधानसभा 2019 : राज्यात 6 वाजेपर्यंत 60.5 टक्के मतदान पार पडलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. राज्यातील 3 हजार 237 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने निवडणूक यंत्रणांना थोडे कष्ट घ्यावे लागले. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान पार पडलं. राज्यात 60.5 टक्के मतदान पार पडलं.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसोबतच सोबतच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याने ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली.

96 हजार मतदान केंद्रे
राज्यात 96 हजार 661 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यामध्ये 95 हजार 673 ही मुख्य तर 1188 ही सहाय्यक केंद्रे होती. एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात 4 कोटी 68 लाख 75 हजार 750 पुरुषांचा समावेश होता. यावेळी 2634 तृतीयपंथी, 3 लाख 96 हजार अपंग आणि 1 लाख 17 हजार 581 सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like