विधानसभा 2019 : राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा ? काय सांगतात ‘एक्झिट पोल’चे आकडे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज(सोमवारी) सर्वांनी मतदान केलं. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलं जावं यासाठी अनेक स्तरातून जनतेला प्रोत्साहन दिलं जात होतं. लोकांनीही मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडत मतदानाचा हक्क पार पाडला. अनेक वृद्धांनी, व्हील चेअरवर असणाऱ्यांनी अपंगांनीही आपले मत वाया जाणार नाही याची काळजी घेतली आणि आपला मतदानाचा हक्क बजावला.

अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले. काही ठिकाणी गोंधळ झाल्याचेही दिसून आले. मतदान तर पार पडले आता लोकांमध्ये चर्चा आहे ती म्हणजे कोणत्या पक्षाच्या किती जागा येतली. तसेच महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी सत्ता कोण येणार आहे ते समजलेच. परंतु एक्झिट पोलच्या माध्यमातून याबाबत काही आकडेवारी समोर आली आहे ज्याच्यावरून आपण संभाव्य निकाल पाहू शकतो. दुपारी 3 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.

वेगवेगळया संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा मिळतील ?

एकूण जागा – 288
महायुती – 192 ते 216
महाआघाडी – 55 ते 81
अपक्ष/इतर – 4 ते 21

मुंबई – एकूण जागा- 36
महायुती – 29 ते 33
महाआघाडी – 0 ते 6
अपक्ष/इतर – 1 ते 2

ठाणे कोकण – एकूण जागा- 39
महायुती – 30 ते 34
महाआघाडी – 3 ते 7
अपक्ष/इतर – 1 ते 3

मराठवाडा – एकूण जागा – 46
महायुती – 25 ते 29
महाआघाडी – 12 ते 16
अपक्ष/इतर – 1 ते 3

विदर्भ – एकूण जागा-62
महायुती – 47 ते 51
महाआघाजी – 6 ते 10
अपक्ष/इतर – 2 ते 4

पश्चिम महाराष्ट्र – एकूण जागा – 70
महायुती – 40 ते 44
महाआघाडी – 23 ते 37
अपक्ष/इतर – 0 ते 3

उत्तर महाराष्ट्र – एकूण जागा – 35
महायुती – 21 ते 25
महाआघाडी – 11 ते 15
अपक्ष/इतर – 0 ते 1

(टीप : हे केवळ एक्झिट पोल आहेत. विधानसभेचा निकाल दि. 24 ऑक्टोबरला आहे. या वृत्तावरून आम्ही कोणताही दावा करत नाहीत.)