‘काश्मीरमध्ये अंबानी-अदानींना जागा देण्याचा सरकारचा घाट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीरमध्ये उद्योगपती अंबानी आणि अदानी यांना जागा देण्याचा सरकारने घाट घातला आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भावनिक प्रश्नांवर निवडणूक नेण्याचा भाजपचा प्रयत्न
नवाब मलिक म्हणाले, “फडणवीस सरकारने 5 वर्षात ज्या कामाचे भूमीपूजन केले ते काम पूर्ण केल्याचा एकतरी प्रकल्प दाखवून द्यावा. आघाडी सरकारने सुरुवात केलेल्या कामाचे श्रेय घेत हे सरकार फिरत आहे. राज्यात कंपन्या बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. भावनिक प्रश्नांवर निवडणूक नेण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे. काश्मीरमधील जागा अंबानी आणि अंदानी यांच्या घशात घालण्याचा घाट सरकारने घातला आहे.” असा आरोप मिलक यांनी केला. आघाडीचा संयुक्त जाहीरनामा

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मलिक म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रावादीने एकत्रित निडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्ष संयुक्तरीत्या जाहीरनामा देतील. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार होता. परंतु दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत तर जाहीरनामाही एकत्र देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसने मान्यता दिल्यानंतर आघाडीचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे.

Visit : policenama.com