कोल्हापूर : राजेंच्या उमेदवारीचे ‘डिपॉजिट’ भरण्यासाठी वुद्धेने विकल्या ‘शेळ्या’
कागल : पोलीसनामा ऑनलाइन – चिमगावच्या सोनाबाई आंगज या वृद्धेने आपल्या दोन शेळ्या विकून अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा म्हणून त्यांचे डिपॉजिट भरले. आपण मंडलिक गटाचे असून खासदारकीच्या निवडणूकीवेळी राजेंनी आमच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी मदत केली होती. आता मी ही मदत करुन त्याची परतफेड करत आहे.
समरजितसिंह यांनी कागल, गडहिंग्लजसह उत्तूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यावेळी त्यांनी लोकांना आवाहन केले की स्वाभिमानी लोकांनी लाचारी झुगारुन पिवळे वादळ निर्माण केले आहे. आता क्रांती करुन स्वराज्य उभे करुयात. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यांस हार अर्पण करुन अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी पदयात्रेतील हजारो लोकांना मार्गदर्शन केले. यानंतर छत्रपती शाहू महाराज, राजे विक्रमसिंह घाटगे, जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
समरजीत सिंह म्हणाले, विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक यांनी स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा वारसा दिला आहे. 2009 साली सदाशिव राव मंडलिक यांनी अपक्ष लढून लोकसभा जिंकली होती. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने लोक संतप्त होते आणि त्यांनीच निवडणूक हातात घेऊन त्यांना विजयी केले. असाच प्रकार माझ्यासोबत झाला, आता स्वाभिमानी जनता याची पुनरावृत्ती करेल. जनतेच्या आग्रहखातर स्वाभिमानाने निवडणूक लढत आहे, मतदार संघात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करुयात.
दरम्यान राणोजीराजे घोरपडे तब्येत खराब असल्याने उपस्थित राहू शकले नाही, परंतू त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत. समर्थकांनी दिलेले आशिर्वाद हीच माझी ऊर्जा आहे असे समरजितसिंह यांनी सांगितले.
Visit : Policenama.com
- बाजारातील ‘कोल्ड्रिंक’ पेक्षा घरात अशी तयार करा आरोग्यदायी शीत पेय
- लिंबू सरबत आरोग्यासाठी आहे गुणकारी, नियमित घेतल्यास होतील ‘हे’ फायदे
- तारुण्य टिकविण्यासाठी तरूणांनी ‘हे’ खावे, व्यक्तीमहत्व खुलण्यासाठी आवश्य
- दम्याचा त्रास असेल तर घरातील ‘हा’ पदार्थ आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
- मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय
- पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय
- महिलांनी ‘हे’ फळ खाल्ले तर येणार नाही ‘हार्टअटॅक’, हे आहेत आरोग्यदायी फायदे
- तुम्हाला ‘ही’ सवय असेल तर वेळीच व्हा सावध, हाडे होऊ शकतात ठिसूळ
- परीक्षेचे टेन्शन घेऊ नका, तणावमुक्त राहण्यासाठी अशी करा तयारी
- आरोग्यासह सौंदर्य प्रदान करणारे आहे ‘हे’ पारंपारिक पेय, नियमित प्या