काय सांगता ! हो, हो ‘या’ मतदार संघात भाजप विरूध्द शिवसेनाच्या उमेदवारामध्ये ‘सामना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्ती सहकारी मानले जाणाऱ्या सतीश सावंत यांनी नुकताच स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेनेच्या विरोधामुळं नारायण राणेंचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल स्पष्ट काही बोलणं टाळलं होतं. मात्र त्यांचे पुत्र नीतेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला असून त्यांना कणकवली मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. राणेंची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने त्यांचे २५ वर्षांपासून निकटवर्तीय असणारे सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. सावंत यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून सावंत नारायण राणेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. म्हणून त्यांनी स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे कणकवली मतदार संघात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

नारायण राणे आणि शिवसेना वाद –

नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत. शिवसेना सोडल्यापासून राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करताना दिसतात तर लोकसभा 2014ची निवडणूक असो, विधानसभा असो, वांद्रे पोटनिवडणूक असो की, 2019ची लोकसभा निवडणूक, शिवसेनेने नारायण राणे यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

visit : Policenama.com