पुढच्या निवडणुकीपर्यंत ‘मनसे’ फक्त पेपर वाचण्यापुरतीच राहील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘पुढच्या निवडणुकीपर्यंत ते फक्त पेपर वाचण्यापूरते राहतील’, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या ‘हीच ती वेळ’ या जाहीरनाम्याचे मातोश्री निवासस्थानी प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे यांनी आता विरोधीपक्षाची सूत्रे हाती द्या, असे आवाहन यांनी केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ‘यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रंगत नाही कारण समोर विरोध करणारेच कोणी दिसत नाही. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे निकाल स्पष्ट आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत ते फक्त पेपर वाचण्यापूरते राहतील. ‘

विधानसभा निवडणुकीचा शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. दहा रुपयांत थाळी, एक रुपयात आरोग्य चाचणी, विज बिल कपात अशा अनेक घोषणांचा पाऊस शिवसेनेच्या वचननाम्यात करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com