विधानसभा 2019 : मुख्यमंत्र्यांना घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘हे’ 9 जण मैदानात, निवडणूक लढणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यातील पाच उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसने देखील 50 उमेदवारांची यादी तयार केली आहे. उमेदवारांची यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या नागपूर पश्चिममधून त्यांना घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. या मतदारसंघातून एखाद्या बड्या नेत्याला तेथून तिकीट दिलं जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झाले आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. तर उर्वरीत 38 जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदावरा जाहीर केले आहेत. तर काँग्रेसने 50 उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, अद्याप भाजप-शिवसेनेची युतीबाबात चर्चा सुरु आहेत.

काँग्रेसच्या उमेदवारांची संभाव्य यादी
पृथ्वीराज चव्हाण – कराड
अशोक चव्हाण – भोकर
बाळासाहेब थोरात – संगमनेर
यशोमती ठाकूर – तिवसा
विजय वडेट्टीवार – ब्रम्हपुरी
नितीन राऊत – नागपूर उत्तर
नाना पटोले – साकोली
बसवराज पाटील – उमरगा
वर्षा गायकवाड – धारावी

You might also like