…तर राजकारणातून संन्यास घेईन : CM देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर करत अ‍ॅक्सिस बँकेला मदत केल्याच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिल आहे. विरोधकांनी माझ्यावरील एकही आरोप सिद्ध केले तर मी राजकारणात संन्यास घेईन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं आहे.

अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं
या प्रकरणी स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘पोलिसांच्या पगाराची खाती सरकारी बँकेतून अ‍ॅक्सिस बँकेत बदलली. मात्र हा निर्णय अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे खाते बदलण्याचं काम मार्च 2005 मध्ये झाले. अमृतासोबत माझं लग्न नोव्हेंबर 2005 मध्ये झालं. मला स्वप्न पडलं नव्हतं मी 2019 मध्ये मुख्यमंत्री होईन विरोधकांनी माझ्यावरील एकही आरोप सिद्ध केले तर मी राजकारणात संन्यास घेईन अन्यथा आरोप करणाऱ्यांनी राजकारण सोडावं. ‘

विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही
गेल्या 4 वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, 15 वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. आघाडी शासन असताना आम्ही पुरावे देऊन आरोप केले, त्याची साधी चौकशीही या लोकांनी केली नाही. मात्र यांनी जे पुराव्याशिवाय आरोप केले त्यांची चौकशी आम्ही केली. त्यामुळे विरोधकांना बोलण्याचा अधिकार नाही. असेही फडणवीस म्हणाले आहेत.

काय आहेत आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्या हितसंबंधांसाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ईडीकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे वेतन आधी स्टेट बँक ऑफ इंडियामधून व्हायचे. पण, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत हे व्यवहार एसबीआयकडून काढून घेत आपली पत्नी काम करत असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेकडे सोपवले. असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Visit – policenama.com